कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध : अमोल शिंदे.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी बसवर हल्ला करून चालकास कन्नड येत नसल्याकारणाने त्याच्या तोंडाला काळेफासून कन्नड वेदिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालकास मारहान केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला तसेच कर्नाटकच्या एसटी चालकास व वाहकास पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष अमोल बापू शिंदे, सोलापूर आगार अध्यक्ष नाना मस्के, केंद्रीय कार्यकारणी सदस्य शरद काटे, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख नानासाहेब शिंदे, उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री, बाळासाहेब बिडकर, ज्ञानेश्वर लामकाने, प्रकाश अवस्थी, करण कोळेकर, सचिन पाटील, महेश मुळे, सोमनाथ पाटील, महावीर नळे, बाळासाहेब मोरे यांच्यासह आदी एसटी कर्मचारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments