Hot Posts

6/recent/ticker-posts

लांबोटी चौकात छत्रपतींच्या मूर्तीची पीआय शेडगे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना.

 लांबोटी चौकात छत्रपतींच्या मूर्तीची 

पीआय शेडगे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना.

घराघरात शिवजयंती साजरी होणे गरजेचे - पीआय शेडगे.

४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही प्रत्येक घरामध्ये साजरी होणे गरजेचे आहे. छत्रपतींच्या विचार आणि वारसा याची जपणूक करत तरुण पिढीने त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा असे मत मोहोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले.

लांबोटी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ जयंती निमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना शेडगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मल्लिकार्जुन रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोहोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी रक्तदान करून या शिबिराचे उदघाटन केले. मल्लिकार्जुन रक्तपेढीचे चेअरमन आदम शेख, व सागर कोळी, हर्षद लोंढे ,श्रुती कसबे, गायत्री खुळे, दिपाली क्यातानकेरी, कोमल भालशांकर, आदी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाचे उत्सव अध्यक्ष श्रीधर चट्टे, उपाध्यक्ष भारत शिंदे, सचिव समाधान व्यवहारे, विकास जाधव , कुमार चट्टे ,अमर जाधव, चंद्रकांत जाधव, वासुदेव चट्टे, मोहन खताळ, काय नाव विलास शिंदे, मरप्पा जाधव , शहाजी शिंदे गणेश खताळ, वैभव चट्टे, सचिन व्यवहारे, शंकर चट्टे, संकेत व्यवहारे, आनंद व्यवहारे, अविनाश चट्टे, लखन माने यांच्यासह कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जाधव यांनी केले तर आभार कुमार चट्टे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments