टेंभुर्णी पोलीस ठाण्यास पाच लाख रुपयांचे संगणक व प्रिंटर :
माजी आ.बबनराव शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा नियोजन मंडळच्या निधीतून टेंभुर्णी पोलीस ठाणेस आलेल्या पाच लाख रुपयांचे सात संगणक व तीन प्रिंटरचा लोकार्पण माजी आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.पोलीस ठाण्यास संगणक मिळावेत यासाठी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मागणी होती.त्यानुसार माजी आ.बबनराव शिंदे यांच्या शिफारशी वरून संगणक साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मंजूर करण्यात आला होता.यामध्ये सात एचपी कंपनीचे ऑल-इन-वन संगणक व लेझर कंपनीचे तीन प्रिंटर चा समावेश आहे.
यावेळी माजी आ.बबनराव शिंदे यांनी सध्या संगणूक युग असून याचा सामान्य जनतेसाठी वापर व्हावा असे म्हटले.तर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे,पोसई कुलदीप सोनटक्के, पोसाई अजित मोरे, मार्केट कमिटीचे धनंजय मोरे, सपोफौ.विलास रणदिवे,नोटरीचे ॲड संतोष कानडे, पत्रकार सदाशिव पवार, संतोष पाटील,आबा साळुंके,नाथा सावंत,ॲड.मंगेश देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी सतीस नेवसे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात,सचिन होदाडे,सोमनाथ तांबे, आरपीआयचे माजी जिल्हाउपध्यक्ष जयवंत पोळ, टेंभुर्णी चे माजी सरपंच दत्तात्रय देवकर,रोहित देशमुख, वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे ,यांच्यासह पोलीस कर्मचारी बिरूदेव मार्कड,भास्कर गरड,बिरुदेव हजारे ,सुनील सरडे,संजय पांडेकर,सहा पोलीस उपनिरीक्षक ,विनोद साटे ,गणेश जगताप ,नितीन,डखवले,मुकुब,तांबोळी ,नितीन तळेकर,विशाल शिंदे ,राजेश लांडगे ,दत्ता पवार,हनुमंत जिंजे,पोलीस नाईक व पोलीस कॉन्स्टेबल,प्रवीण साठे, प्रसाद अनुभुले, सचिन साळुंखे, महेश साळे, प्रशांत किरवे, गणेश इंगोले, उमेश खराडे उपस्थित होते.

0 Comments