Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री अमोगसिद्ध समाज सेवा मंडळ संचलित श्री सद्गुरु धुळेश्वर विद्यालय व लिटल स्टार पब्लिक स्कूल मध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला.

 श्री अमोगसिद्ध समाज सेवा मंडळ संचलित 

श्री सद्गुरु धुळेश्वर विद्यालय व लिटल स्टार पब्लिक स्कूल 

मध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब काळे, संस्थेच्या उपाध्यक्षा वंदना काळे, श्री सद्गुरु धुळेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना पाटील मॅडम तसेच लिटल स्टार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व रुक्मिणी मातेच्या पूजनाने झाली.त्या नंतर प्रशालेचे वार्षिक अहवाल सादर करण्यात आले . अहवाल व वर्षभर झालेल्या कार्यक्रमांचे तोंड भरून कौतुक संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब काळे सर यांनी केले. व सर्व मातापालकांनी शाळेत असेच सहकार्य करावे असे अव्हान देखील सरांनी केले . तसेच याप्रसंगी मुख्याध्यापिका कोरे मॅडम म्हणाल्या "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी "आपल्या भारताची भावी पिढी घडवण्याचं काम आपण माता पालक करू शकतो.यामुळे महिलांमध्ये  एक विगळीच ऊर्जा दिसत होती.तसेच संस्थेच्या वतीने महिलांना वान देण्यात आला व उखाण्याची तसेच संगीत खुर्चीची स्पर्धा यांचे देखील आयोजन केले होते. याचा सर्व मातापलकांनी मनसोक्त आनंद घेतला.

याप्रसंगी प्रशालेच्या माता पालक संघाच्या अध्यक्षा चेताली शिवणकर मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments