Hot Posts

6/recent/ticker-posts

पुढाऱ्यांच्या मदतीने घर जागा हडपण्याचा प्रयत्न

पुढाऱ्यांच्या मदतीने घर जागा हडपण्याचा प्रयत्न 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मौजे तांबोळे, ता. मोहोळ येथील दलित विधवा महिला श्रीमती रंजना गोरख नेटके या आपल्या न्याय्य हक्कासाठी पंचायत समिती मोहोळ कार्यालयापुढे दिनांक ०७ फेब्रुवारी पासून "बेमुदत धरणे आंदोलनास" बसलेल्या आहेत. श्रीमती नेटके यांची घर जागा हडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने काही पुढाऱ्यांच्या मदतीने सुरू केलेला आहे.
श्रीमती रंजना नेटके यांचे एवढेच म्हणणं असं आहे की माझे घर, घर जागा सोडून व मला येण्याजाण्या रस्ता सोडुन तुम्ही कुठेही तुमच्या घराचे बांधकाम करा. माझ्या घरजागेवर अतिक्रमण करु नका. परंतु गेंड्याचं कातडी पांघरलेलं प्रशासन राजकीय पुढार्यांच्या दडपशाही पुढे हातबल झाले असून या विधवा महिला भगिनीस कोणीही न्याय द्यायला तयार नाही. हि महिला भगिनी गेली ८ महिने याप्रकरणी सातत्याने प्रशासनाशी अर्ज विनंत्या करते आहे. गेल्या ४ दिवसापासून सदरची महिला आपल्यावरील होत असलेल्या अन्यायास दाद मागण्यासाठी पंचायत समिती मोहोळ समोर उपोषणास बसलेली आहे.
दुसरी घटना म्हणजे मौजे मलिकपेठ, ता. मोहोळ ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जगताप यांनी तेथील दलित ग्रामपंचायत सदस्या सौ. विद्या रजनीश कसबे यांनी "ग्रामपंचायतीमध्ये दलितांचे प्रश्न मांडायचे नाहीत. ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये कुठलीही ढवळाढवळ अगर हस्तक्षेप करावयाचा नाही. म्हणून ग्रामपंचायतीमध्ये तू यापुढे येऊ नको. ग्रामपंचायतीवर सत्ता माझी आहे" अशा पद्धतीने त्या दलित महिलेस ग्रामपंचायतीत येणेस मज्जाव केलेला आहे. सदर भगिनी याबाबत गेल्या पंधरा, विस दिवसांपासून प्रशासनाकडे दाद मागते आहे. परंतु याबद्दल पोलीस प्रशासन अगर गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. तसे पाहता या दोन्हीही घटना लाजिरवाण्या व निंदनीय असून याप्रकरणी संबंधित प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आहे. जर आज सायंकाळपर्यंत सदर महिला भगिनींस संबंधित प्रशासनाने न्याय दिला नाही तर गटविकास अधिकारी यांचे तोंडाला काळे फासणार
Reactions

Post a Comment

0 Comments