शिवजयंती शिवविचारांची साजरी करा- शिवश्री गणेश नीळ
कोंडी (कटूसत्य वृत्त):- जिजाऊ ज्ञानमंदिर कोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक गणेश नीळ ,प्राचार्या सुषमा नीळ, मुख्याध्यापक वैभव मसलकर, अर्चना औराद, महादेवी माने उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री नीळ, श्रावणी वाघचवरे, ईश्वरी भोसले याविद्यार्थ्यांनी मनोगतातून छत्रपतींच्या कार्याची माहिती सांगितली. विद्यार्थी जी पारंपरिक वेशभूषेत आले होते. संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. शिवगर्जना, आरती,पाळणा, पोवाडे यांचे सादरीकरण करण्यात आले तसेच गावात रॅली काढण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. तसेच पारंपारिक खेळ लेझीमचे विद्यार्थ्यांकडून बहारदार सादरीकरण करण्यात आले. शिवश्री गणेश नीळ यांनी शिवजयंती शिवविचारांची साजरी होणं सर्वात महत्त्वाचे आहे हा विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन शीतल कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन संकेत मोरे यांनी केले.
.png)
0 Comments