बार्शीत दिली एकाच वेळी १०५ विद्यार्थ्यानी शिवगर्जना
बार्शी (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण राज्यात प्रथमच बार्शी मध्ये एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना ३९५ व्या जयंतीनिमित्त मानवंदना दिली. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालय परिसरातील अश्वारूढ असलेल्या महाराजांच्या पुतळ्यासमोर व बार्शीतील शिवसृष्टी या दोन्ही ठिकाणी एकत्र येत १०५ मुला मुलींनी मिळुन एक साथ गारद ( शिवगर्जना) दिली. यामध्ये कुमारी - आरोही अमोल शहाणे व पोतदार इंग्लिश मिडीयम स्कूल चे १०४ विद्यार्थीं सहभागी होते. गारद हि एकच व्यक्ती देते व बाकी लोक जयघोष करतात हे आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी पाहत आलोत.पण एका तालात - सुरात १०५ विद्यार्थ्यांनी गारद दिली तेंव्हा संपूर्ण परिसरात उभ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा आला.एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी एकत्र येत गारद देणं हि राज्यातील पहिलीच संकल्पना आहे. शालेय विद्यार्थींना शिवगर्जना अर्थासहित संपूर्ण पाठ असावी हा हेतू यामागे होता.हि आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी साठी बाळराजे देशमुख , कु.अमृता रंगदाळ , पोतदार इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच अमोल शहाणे व भावना शहाणे, आदींनी परिश्रम घेतले.
.png)
0 Comments