जुळे सोलापूर, विडी घरकुल उपआराखडा संपुष्टात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेने २०१६ मध्ये जुळे सोलापूर भाग दोन आणि हैदराबाद रोड विडी घरकुल या परिसराचा उपविकास आराखडे तयार केले. त्यांना २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली होती.
परंतु महापालिकेने सर्व उपआराखड्यांचे एकत्रिकरण करून नवा विकास आराखडा तयार करताना जुन्या उपआराखड्याचे भवितव्य संपुष्टात आणले आहे. यावर सत्ताधारी भाजप पक्षानेच आक्षेप घेतला आहे तर विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे.
म्हाडा प्राधिकरणाने जुळे सोलापूर भाग १ चा उपआराखडा १९८४ मध्ये तयार केला होता. त्यानंतर विडी घरकुल व जुळे सोलापूर भाग २ हे दोन उपआराखडे २०१६ मध्ये तयार करण्यात आले. या आराखड्यांना २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. या आराखड्याची मुदत २० वर्षे इतकी आहे. नियमानुसार २०३८ ला या आराखड्याचे अधिकार संपुष्टात येणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेने आता २०२४ च्या आराखड्यात समाविष्ट केल्याने या आराखड्यातील आरक्षणाची मुदत २०४८ पर्यंत जाणार आहे.
0 Comments