Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी धरण उणे ८० टक्के झाल्यावरही पाणीपुरवठा राहणार सुरळीत

 उजनी धरण उणे ८० टक्के झाल्यावरही पाणीपुरवठा राहणार सुरळीत

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची नवी समांतर जलवाहिनी १५ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. १५ दिवस धरणातून पाणी उपसा करून प्रात्यक्षिक केले जाणार असून, त्यानंतर १ एप्रिलपासून शहराच्या गावठाण भागाला (मूळ शहर) एकदा दोन आणि एकदा तीन दिवसांआड, असे आठवड्यातून तीनवेळा पाणी सोडले जाईल. त्यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सोलापूर ते उजनी या ११० कि.मी. समांतर जलवाहिनीचे काम सध्या दीड कि.मी. राहिले आहे. आता देगाव नाल्यातून पाइप जोडणी सुरू असून, टेंभुर्णी बायपासजवळील काम देखील पूर्ण झाले आहे. कुरूल- कामती रोडवर (मोहोळ शहराजवळ) पाइप जोडणी सुरू असून, तेथे ५० मीटर काम राहिले आहे. याशिवाय वडाचीवाडी व देवडी येथे दोन शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जलवाहिनी जाणार असल्याने त्यांना मोबदला देऊन ते काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच धरणापासून मुख्य रस्त्यापर्यंत ६०० मीटर काम बाकी आहे. आगामी २० दिवसांत ही अर्धवट कामे पूर्ण केली जाणार आहेत. तत्पूर्वी, धरणावरील चार पंपहाउसचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून, विजेची जोडणी देखील करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments