सोलापूर एसटी आगारातील महिलांची सुरक्षा रामभरोसे
संभाजी ब्रिगेड चा आंदोलनाचा इशारा
सोलापूर(कटूसत्यवृत्त):- पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असतानाच आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षे बाबत सोलापूर बस स्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचे दिसून आले रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपो मध्ये एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन-चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे एवढा मोठा बस स्थानक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही याबाबत आगर व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षेचे बाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला पुण्यातील प्रकरणानंतर हि सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले
संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगर प्रमुख नागेश जाधव यांनी दिले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष भैया जगदाळे गोवर्धन मामा गुंड संपर्कप्रमुख शत्रुघन माने वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट गणेश कदम दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले कार्याध्यक्ष यशवंत लोंढे उपाध्यक्ष प्रशांत देशमुख संतोष सुरवसे जिल्हा सचिव राजेंद्र माने संघटक सतीश वावरे संघटक चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धराम सावळे आदी उपस्थित होते.

0 Comments