Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा. डॉ. संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

 प्रा. डॉ. संजय लांडगे आणि  प्रमोद लांडगे 

यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. संजय लांडगे यांचे पंचवीसावे पुस्तक 'ईश्वररूप आई व तसेच 'हृदयी प्रेम फुलताना (मराठी गझल संग्रह) मराठी रंगभूमी आणि सत्तरोत्तरी नाटकांचा विचार (नाट्य समीक्षा) त्याच बरोबर सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक  प्रमोद लांडगे लिखित अंगार - मुक वेदनांचा (कथासंग्रह) या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा समता साहित्य व कला मंडळाने आयोजिला आहे. हा प्रकाशन सोहळा  डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरु पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक  योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षते खाली दि. 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक 5-00 वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक, सोलापूर येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति सुप्रसिध्द ज्येष्ठ कविवर्य हेमकिरण पत्की,  प्रमोद लांडगे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री सौ. वंदना कुलकर्णी, प्राचार्य डॉ. शिरिष नागनाथ भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे.

डॉ. संजय लांडगे यांचे पंचवीस सहवीस, सत्तावीसावे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा आनंद रसिक वाचक व त्यांच्या विद्यार्थीवर्गाला होत आहे. आजवर त्यांच्या पुस्तकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्यसरकाचा राज्य पुरस्कार तसेच छ. शाहू महाराज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, छ. शिवाजीराजे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे राज्य पुरस्कार, वामनदादा कर्डक काव्य राज्य पुरस्कार, जनसाहित्य परिषद अमरावती यांचा राज्य पुरस्कार आणि इतर 16 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. संजय लांडगे यांचे ग्रंथ - 1) उपयोजित मराठी, 2) वसंत कानेटकरांची नाट्यसृष्टी 3) संत तुकाराम आणि संत कबीर एक चिंतन, 4) आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास ही पुस्तके बी.ए. भाग, 1, 2, 3, व एम, ए. भाग 1 साठी संदर्भग्रंथ म्हणून, पु. अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे अभ्यासक्रमासाठी निवडली गेली होती.

प्रा. डॉ. संजय लांडगे व प्रमोद लांडगे यांचे साहित्य महाराष्ट्रातील मान्यंवर दैनिक, मासिके आणि दिवाळी अंकातून प्रसिद्ध होत असते. कविता, कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक, आत्मकथन, चरित्र, समीक्षा अशा विविध वाङमय प्रकाशन यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गेली चाळीस वर्षे ते सातत्याने लेखन करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments