मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या
गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथे २४ डबे असलेल्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:-
दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन
* ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस दिनांक २६.०२.२०२५, २७.०२.२०२५, २८.०२.२०२५ रोजी दादर पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
* ट्रेन क्रमांक २२१४४ बिदर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस दिनांक २७.०२.२०२५, ०१.०३.२०२५ रोजी दादर पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
* ट्रेन क्रमांक २२१०८ लातूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस दिनांक २८.०२.२०२५ रोजी दादर पर्यंत पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
पुणे येथे शॉर्ट टर्मिनेशन
* ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस दिनांक ०१.०३.२०२५ रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
* ट्रेन क्रमांक १११४० होसपेट-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस दिनांक ०१.०३.२०२५ रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
* ट्रेन क्रमांक १२११६ सोलापूर-सीएसएमटी मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस दिनांक ०१.०३.२०२५ रोजी पुणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट होईल.
पुणे येथे शॉर्ट ओरिजिनेशन
* ट्रेन क्रमांक ११३०१ सीएसएमटी मुंबई-केएसआर बेंगलुरु उद्यान एक्स्प्रेस दिनांक ०२.०३.२०२५ रोजी पुणे येथे शॉर्ट ओरिजिनेट होईल.
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी हे बदल लक्षात घ्यावेत आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
.jpg)
0 Comments