क्रेडाई महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी सोलापूरचे शशिकांत जिड्डीमनी
अध्यक्षपदी प्रफुल तावरे , आशिष पोखरना सचिव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय शिखर संघटना क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बारामती येथील प्रफुल तावरे तर उपाध्यक्षपदी सोलापूरचे शशिकांत जिड्डीमनी यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत २०२५-२७ या कालावधीकरिता राज्य कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. सचिवपदी अहिल्यानगरचे आशिष पोखरना यांना संधी देण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर अनेक वर्षे क्रेडाई महाराष्ट्र पातळीवर अनेक पदे भुषवली आहेत. मावळते अध्यक्ष प्रमोद खैरनार, सतीश मगर , छाननी समितीचे अनंत राजेगावकर, राजीव पारेख व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे तसेच सर्व सदस्यांनी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नवनियुक्त कार्यकारी मंडळाचे व नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments