Hot Posts

6/recent/ticker-posts

मातीला पंख फुटताना’ या कादंबरीचा शनिवारी प्रकाशन सोहळा

 मातीला पंख फुटताना’ या कादंबरीचा शनिवारी प्रकाशन सोहळा  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लेखिका डॉक्टर स्मिता पाटील, मोहोळ यांच्या 'मातीला पंख फुटताना'या कादंबरीचा व 'नाही गिरवता येत कुठलीच लिपी' या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते तसेच सुप्रसिद्ध लेखक, बालसाहित्यकार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे मनोरमा साहित्य परिवाराचे माननीय श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. डॉ. स्मिता पाटील यांचे हे पाचवे पुस्तक असून या आधीच्या साहित्यकृतीनां अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणाच्या दुरावस्थेवर या कादंबरीत प्रकाश टाकण्यात आला आहे. नेटके घटना, प्रसंग, सुरेख व्यक्तिरेखा व परिणामकारक भाषाशैली या वैशिष्ट्यांनी सजलेली ही साहित्यिक कृती रसिकांच्या पसंतीस निश्चितच उतरेल. दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता निर्मल कुमार फडकुले या सभागृहात पार पडत आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments