Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून टेंभुर्णी शहरातील महिला सफाई कामगार तसेच विधवा माता-भगिनींचा तिळगुळ स्नेहमेळावा संपन्न

 जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून टेंभुर्णी शहरातील महिला सफाई कामगार तसेच विधवा माता-भगिनींचा तिळगुळ स्नेहमेळावा  संपन्न



टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील टेंभुर्णीच्या नूतन कर्तव्यदक्ष सरपंच सौ.सुरजा योगेश बोबडे यांच्या पुढाकाराने महिला सफाई कामगार तसेच विधवा माता- भगिनींसाठी तिळगुळ स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजामध्ये आपण विविध तिळगुळ मेळावे तसेच हळदीकुंकू समारंभ आयोजित केलेले पाहत असतो परंतु विधवा माता-भगिनींचा विचार कोणीही करत नाही परंतु जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले,रमाई आंबेडकर,अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराच्या प्रेरणेतुन सर्व सामान्य महिलांच्या आनंदासाठी दरवर्षी तिळगुळ स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित केला.
      महाराष्ट्राच्या मातीत रणरागिणींचा इतिहास दैदिप्यमान आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर, सावित्रीमाई फुले यांच्या त्यागामुळे व कार्यामुळेच आज महिला सन्मानाने समाजात वावरत आहेत. महिलांचे भाग्याचे लेणं म्हणजेच कुंकू परंतु अशा हळदी-कुंकू समारंभामध्ये विधवा माता-भगिनींना सहभागी होता येत नाही त्यांना देखील त्यांचा मान मिळावा म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून या महिलांसाठी तिळगुळ स्नेह मेळावा तसेच स्नेहभोजनाचे आयोजन केले.या कार्यक्रमात महिला भगिनींना साडी-चोळी आणि तिळगुळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी महिलांसोबत संवाद साधत त्यांना आधार, प्रोत्साहन आणि सन्मानाची भावना व्यक्त केली. संस्कृती, सन्मान आणि ऐक्य यांचे प्रतीक असलेला हा सोहळा नारीशक्तीचा गौरव आहे असे मत    उपस्थित महिलांनी केले.
    या कार्यक्रमाला सरपंच सुरजा बोबडे, अनुराधा काकी, सुनिता अनंतकवळस, स्वरूपाताई बोबडे, सुरालीताई बोबडे, धनश्रीताई ढवळे, पल्लवीताई गायकवाड, मितालीताई शहा, आशा निमसे, रेखाताई ढवळे, ज्योती रेडेकर, उर्मिलाताई बारबोले, सुवर्णा देशमुख, अर्चना कुटे इ. महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments