Hot Posts

6/recent/ticker-posts

वीरतपस्वी शिक्षण संकुलात 'आनंद मेळ्या'चा शुभारंभ

वीरतपस्वी शिक्षण संकुलात 'आनंद मेळ्या'चा शुभारंभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल एमआयडीसी येथे आयोजित केलेल्या आनंद
मेळ्याचे उदघाटन रविवारी काशी जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आले.यावेळी सहायक पोलीस आयुक्त राजन माने,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय खोमणे, संस्थेचे सचिव शांतया स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे व शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांनी केले. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांकडून ९० स्टॉल उभारण्यात आले /4आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी अंदाजे चार लाख रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी
विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला व मनोरंजनात्मक खेळ ठेवले आहेत. हॉर्स रायडिंग, जम्पिंग,
मिकी माऊस, पाण्यातील होडी याचाही आनंद वालगोपाळांनी घेतला. यातून विद्यार्थ्यांना
व्यावसायिकतेचे व्यवहारज्ञान, खरेदी-विक्री, नफा-तोटा यांचे ज्ञान मिळाले. या मेळाव्यास
संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व मोठ्या प्रमाणावर पालकांची
उपस्थिती होती. या आनंद मेळाव्यासाठी ३०० वाय ५०० मंडप, ९० स्टॉल,राजस्थान पध्दतीचे भव्य प्रवेशद्वार,१ हजार स्क्वेअर फुटाचे एलईडी वॉल, ५०० फोकस लाईटची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील शाळा व विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यास भेट द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक म्हमाणे यांनी केले आहे.   

Reactions

Post a Comment

0 Comments