गणपती फार्मसीमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-
ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात दि. 27 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधि मध्ये क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहामध्ये विविध खेळ आयोजित करण्यात आले होते तसेच महाविद्यालयातील सर्व डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या क्रीडा सप्ताहात क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी, खो- खो,कॅरम, चेस असे वेगवेगळे
खेळ घेण्यात आले. तसेच क्रिकेट (मुले) मध्ये चौथ्या वर्ष, क्रिकेट (मुली) मध्ये द्वितीय वर्ष, व्हॉलीबॉल (मुले) मध्ये द्वितीय, थ्रो बॉल (मुली) मध्ये द्वितीय वर्ष, कबड्डी (मुले) मध्ये द्वितीय वर्ष, चेस (मुली) मध्ये साक्षी सिद ,चेस (मुले) अनिकेत गायकवाड कॅरम (मुली) स्नेहा सरवदे आणि सविता पालत्या कॅरम (मुले) प्रशांत नाईकनवरे आणि तेजस हुलगे या संघांनी विजय मिळवला. अशा या ३ दिवसीय क्रीडा सप्ताहात अत्यंत आनंदी व खेळीमेळीचे वातावरण महाविद्यालयात निर्माण झाले असून शैक्षणिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा
कौशल्यांना देखील प्राधान्य देणे आज काळाची गरज आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, डॉ.प्रशांत मिसळ प्रा.शिवराज ढगे,प्रा.नामदेव शिंदे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. हा सप्ताह पार पाडण्यासाठी क्रीडा सहायक म्हणून तृतीय वर्षामधील सुमित बरकडे आणि राजनंदिनी शिंदे या विद्यार्थ्यांनी काम केले. तसेच प्रा.प्रियांक खडसरे व प्रा.शैलेश पेंडोर यांनी समन्वयक म्हणून कार्य केले.
0 Comments