"इंद्रजीत सावंत साहेब तुम्हाला मानलं."
इतिहासकारांच्या सडेतोड उत्तरानंतर किरण मानेंची खास पोस्ट
मुंबई (कटूसत्य वृत्त):- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मिळालेल्या धमकी नंतर त्यांनी तात्काळ पावले उचलत सदर व्यक्तीची पोलिसात तक्रार केली. हे प्रकरण सध्या गाजतंय. त्यातच अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सत्ताधारी पक्षांवर टीका केली. किरण माने हे सोशल मीडियावर कायमच ते विविध घटनांवर भाष्य करतात. इंद्रजित सावंत प्रकरणावर त्यांनी भाष्य करत प्रशांत कोरटकर यांना अनाजीपंतांची उपमा दिली. सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेत आहे.
"इंद्रजीत सावंत साहेब तुम्हाला मानलं…
तुमचा निडरपणा बघून ते बांडगुळ भेलं... 'तो मी नव्हेच' कळवळायला लागलं ! त्याला वाटलं सत्तेचा माज बघुन तुम्ही घाबराल… घर आणि प्रोफाइल लॉक कराल… हात जोडून व्हिडिओ काढाल… साताठ माफीनामे लिहाल… चार दिवस घाणा फिरवून टेरीला बुडबुडा आलेल्या बुळग्याला बाप मानणारी ती वृत्ती… पाऊणशे वयाच्या म्हाताऱ्या माणसाला गोळ्या घालणाऱ्या भेकडाला नमन करणारी विकृती… जगानं नाकारलेल्या एका महामुर्ख विदूषकाचे ते भक्त.. त्यांना भारी पडंल आपलं स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या 'लढवय्यांचं रक्त' ! तुम्ही डायरेक्ट नडलात… भिडलात आणि चढलात.. नुसत्या हुलीनं ते कोकरू गांगरून गेलं.. तुमचा निडरपणा बघून ते बांडगुळ भेलं... 'तो मी नव्हेच' कळवळायला लागलं ! मोठ्या माजात त्यानं नांव घेतलं म्हणे एका दळभद्र्या मंत्र्याचं… अख्खा महाराष्ट्र ओकारी करतो थोबाड बघून त्या संत्र्याचं… मतदार यादीतल्या घोटाळ्याची ती घाणेरडी पैदास… शेतकऱ्याचं रक्त पिऊन जगणारा रोगाचा डास… त्या मंत्र्याला तुम्ही कोललंत… कोरटकराला उभं आडवं सोललंत… नुसत्या शब्दाच्या रपाट्यात बंड्यानं लंगोट वल्लं केलं... तुमचा निडरपणा बघून ते बांडगुळ भेलं... 'तो मी नव्हेच' कळवळायला लागलं ! पण एक घोडचूक केली त्या पीठमाग्याच्या पैदाशीनं... छत्रपती शिवरायांवर गरळ ओकली भिकमंग्याच्या अवलादीनं... या चुकीला माफी नाही. सुटका नाही... दया नाही... आता शिवप्रेमी बहुजन करेल या वृत्तीचा अंत... या भुमीत पुन्हा चिरडला जाईल अनाजीपंत ! आम्हाला काळजी एकच वाटते… मानवतेसाठी मनात भितीही दाटते… आई भवानीमातेकडं एकच मागणं… अठ्ठेचाळीसचा आगडोंब पुन्हा उसळू नये... छितपुट बांडगुळांच्या माजापोटी निष्पाप समाज भरडला जाऊ नये... अनाजीपंतासोबत अनवधानानं आमचा बाजीही चिरडला जाऊ नये...
अनाजीपंतासोबत अनवधानानं आमचा बाजीही चिरडला जाऊ नये... असही किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे."अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत किरण माने यांचं समर्थन केलं आहे. "एक नंबर सर, व्वा! इंद्रजित सावंत सरांबरोबर तुम्हाला बी मानलं " अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने "उत्तम शब्दांत कोलाकोल करून तुम्ही राजांचे मावळे आहात हे सिद्ध करून दाखवलत. दरवेळी हेच कां? हा प्रश्न आता हल्ली सगळ्यांना पडू लागला आहे. कारण इतिहास उचलून बघितला तर यांचा काही ना काही सबंध निघतोच. त्यामुळे अश्यांना अश्याच भाषेत उत्तरं दिली की त्याची टाळकी ठिकानावर येतील." अशीही कमेंट एकाने केली आहे.
किरण माने यांच्या या पोस्टवर आता सत्ताधारी नेते काही उत्तर देणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

0 Comments