Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट तालुक्यातील धोकादायक व्यक्ती हिरा गुंजले यास दुसऱ्या वेळेस स्थानबध्द

 अक्कलकोट तालुक्यातील धोकादायक व्यक्ती 

हिरा गुंजले यास दुसऱ्या वेळेस स्थानबध्द

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हुीतील हिरा उर्फ पुरुषोत्तम उर्फ मलप्पा गुंजले, रा. ब्यागेहळी रोड, अक्कलकोट, जि. सोलापुर हा शरिराविषयक व मालाविषयक गंभीर गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. तो मागील अनेक वर्षांपासून त्याची दहशत व भिती राहावी याकरीता नागरीकांशी गुन्हेगारी वर्तन करत होता. त्याच्या विरूध्द खंडणी मागणे, इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, अवैधरित्या हत्यार बाळगणे, अश्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास यापवुर्वी सन 2016 मध्ये व 2019 मध्ये महाराश्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये MPDA अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली होती. स्थानबध्दतेतुन मुक्तता झाल्यानंतर पुन्हा त्याने त्याचे गुन्हेगारी कृत्य चालुच ठेवून अक्कलकोट येथील ट्रॉली चालकाकडे खंडणी मागून जिवे ठारमारण्याची धमकी दिल्याने त्याच्याविरूध्द गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. अश्या स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य करुन हिरा गंजुले याने परिसरात दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले होते. याकरीता अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनामध्ये एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई बाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालयास सादर करण्यात आला होता. कुमार आशीर्वाद जिल्हादंडाधीकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी गुन्हेगार हिरा उर्फ पुरषोत्तम गंजले याचेवर दाखल असलेले गुन्हे व त्याचे गुन्हेगारी वर्तन पाहुन त्याच्यावर वेळीच प्रतिधंक करण्यासाठी MPDA अधिनियम अन्वये 1 वर्षाच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृह, येरवाडा जिल्हा पुणे येथे स्थानबध्द करण्याचे आदेश निर्गमीत केल्याने त्यास स्थानबध्द करण्यात आले आहे.
 
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मनिषा कुभांर, निवासी उपजिल्हादंडाधिकारी, सोलापूर, यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.

         सदरची कामगीरी सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, स.पो.फौ. निलकंठ जाधवर, पो.हे.कॉ. अनिस शेख, पो.हे.कॉ. रमजान पाटील, पो. हे. कॉ.अनभुले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे बालाजी बनसोडे, नायब तहसिलदार, व विलास म्हैत्रे यांनी बजावली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments