Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेत श्री वीरतपस्वी पुण्यतिथी साजरी

 नेताजी शिक्षण संस्थेत श्री वीरतपस्वी पुण्यतिथी साजरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष. ब्र. श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची ६९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते वीरतपस्वींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी महामंगल आरती करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.पूर्वा रेके या विद्यार्थ्यांनीने पूज्य महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.यावेळी विश्वाराध्य मठपती म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात अशिक्षितपणा व अज्ञानाने गुरफटलेल्या समाजाला आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीतून महास्वामीजी प्रबोधन करित होते .विज्ञाननिष्ठ महास्वामीजींनी कित्येक ठिकाणी लोकांना पशुहत्तेपासून परावृत्त केले. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, महास्वामीजी वयाच्या पंधराव्या वर्षापासून श्रावणमास शिवलिंग तपोनुष्ठानास सुरुवात केली. जीवनातील दुःख निवारण करण्यासाठी नेहमी शिवचिंतन, ध्यान, योग, मेडिटेशन काळाची गरज असल्याचे सांगत.त्यांच्या चेहऱ्यावर तपस्येचे तेज अफाट होते. प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन घेतल्याचा साक्षात्कार  भक्तांना होत असल्याचे सांगताना संगदरी, दर्गनहळ्ळी व धोत्री येथील भक्तांना महास्वामीजींचा साक्षात्कार कसा झाला याचे वर्णन पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी केले.यावेळी विठ्ठल कुंभार, शिवानंद पुजारी,विनायक कोरे, भारती पाटील यांच्यासह प्राथमिक मराठी, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेतील १२०० विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.

राजराजेश्वरी शिक्षण संकुल
विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात  शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार व माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे यांच्या हस्ते श्री वीरतपस्वींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महामंगल आरती करण्यात आली. 

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे म्हणाले , श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी हे महान तपस्वी व योगी होते. त्यांचे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. मानव धर्माच्या कल्याणसाठी व विश्वाला शांती मिळण्यासाठी महापूजेच्या माध्यमातून तीस अनुष्ठान केले. गोरगरीब भक्तांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सोलापूरात श्री मद्वीरशैव गुरुकुल व श्री सिद्धलिंग आश्रम स्थापन केले. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज हजारो मुले वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकीक करित आहेत. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले ,पूज्य महास्वामीजीनी अनेक खेडोपाडी जाऊन अनुष्ठान केले. प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन केले . भक्तगणांत असलेली अंधश्रद्धा,अंध विश्वास नाहिसे केले. स्वतः दहा -पंधरा नाटक लिहून नाटकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले.म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज हजारो गावे संस्कारीत झाले व गावातील मुले सुशिक्षित झाल्याचे सांगितले. यावेळी शाळेतील १४०० विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments