Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते विकास आराखडा आरक्षण रद्द करण्याबाबत पालकमंत्री यांना निवेदन

 नातेपुते विकास आराखडा आरक्षण रद्द करण्याबाबत 

पालकमंत्री यांना निवेदन


नातेपुते (कटूसत्य वृत्त) :- नातेपुते नगरपंचायत ने नातेपुते शहराचा विकास आराखडा तयार केला आहे मात्र तो आराखडा चुकीच्या पद्धतीने झाला असल्याने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन नातेपुते विकास आराखडा रद्द करण्याबाबत निवेदन दिले आहे. सदर देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मांडण्यात आले आहे की, नातेपुते नगरपंचायतने नुकताच नातेपुते गावचा विकास आराखडा तयार केला आहे, त्यामध्ये नातेपुते शहरातील अनेक लोकांची घरे, शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आणि व्यापारांची दुकाने याच्यावरती आरक्षण टाकण्यात आले आहे. वास्तविक पाहता नातेपुते गावातील नागरीकांना विश्वासात न घेता हा विकास आराखडा तयार केला आहे त्याची गरज आता तरी नातेपुते शहराला नाही या आराखड्‌यामुळे अनेक नागरीकांचे संसार उध्वस्त होत आहेत. भविष्यातील तीस वर्षाच्या विचार करून मृगजळाप्रमाणे गोरगरिबांच्या सामान्य कुटुंबांच्या  जागेवर आरक्षण टाकलेले आहे पण मागील तीस वर्षापासून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातेपुतेचे मुक्कामी किमान वीस ते पंचवीस एकर जमिनीची मागणी राज्यातील लाखो वारकरी, आळंदी देवस्थान करीत आहे. याबाबत वेळोवेळी महसूल खात्याशी त्यांनी संपर्क साधला आहे. नातेपुते ग्रामपंचायतने याच्या अगोदर प्रत्येक वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सध्याच्या तळालगतची जमीन सुचविलेली आहे तसे ठराव ही झाले आहेत.असे असताना नातेपुते नगरपंचायतीने या ग्रामस्थांच्या व आळंदी देवस्थानच्या मागणीकडे तमाम वारकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी नियोजन आराखड्यात जागा आरक्षित केलेली नाही. पालखीतळासह पुन्हा नव्याने आरक्षण करावे व नातेपुते शहरामध्ये (विकास आराखडा) नुकतेच झालेले आरक्षण शासनाने तातडीने रद्द करावे व बाधित नागरिकांवर झालेला अन्याय दूर करावा अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले. 
Reactions

Post a Comment

0 Comments