मोफत हनुमान दंड प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एक दिवसीय मोफत हनुमान दंड प्रशिक्षण शिबीर पापय्या तालीम संघ व स्वरूपा योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जुनी मिल कंपौंड येथील ऐतिहासिक पापय्या तालीम प्रांगणात उत्साही वातावरणात पार पडली . शिबीरात विविध स्तरातील शेकडो युवक व व्यायाम पटूंनी सहभाग नोंदवला. शिबीराचे उद्घाटन श्री. हनुमान देवतास नारळ वाढवून स्वरूपा योगा सेंटरचे प्रमुख योगा व मुद्रा तज्ञ जयंत पडसलगीकर यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, विश्वस्त गणेश कुलकर्णी, प्रकाश सुरवसे, जयंत मोरे, गजानन लामनाने, शिवाजी चटके, संभाजी मळगे, यांच्या उपस्थितीत पार पडले. योगा व मुद्रा तज्ञ पडसलगीकर यांनी हनुमान दंड प्रशिक्षणाचे विविध प्रात्याक्षिके व फायदे इत्यादीबाबत मोलाचे प्रबोधन व मार्गदर्शन साधकांना केले..
त्यांनी साधकांना हनुमान दंड हा भारतीय परंपरेचा व्यायम आहे. संपूर्ण शरीराला व्यायाम देणारी क्रिया आहे. संपूर्ण शरिराला अद्भुत आपार शक्ती देते. स्नायू मजबूत होतात. शरिरातील सर्व अवयव हात पाय, खांदे, जॉईंट चांगले होतात. शरिराचे रक्ताभिसरण अतिशय चांगले होते. क्रोध व मानसिक ताण नाहीसा होतो. शरीर वज्रदेही होते. साहास, धैर्य अंगी येते. व्यायामपटुंनी दैनंदिन २०० ते ३०० हनुमान दंड घातले असता बॉडी मजबूत होते. हा व्यायाम फक्त भारतात आहे असे नाही, निरनिराळ्या ८ परदेशी जीममध्ये नियमित पुरूष व महिला घालतात. हनुमान आजही जीवंत आहे. त्याला अजरामरचे वरदान प्राप्त झाले आहे. इत्यादी हनुमान दंडाची महती व फायदे साधकांना प्रबोधन केले.
शिबीराची सांगतावेळी पडसलगीकर सर यांचा सत्कार तालमीचे जेष्ठ नागरिक व्यायामपटू सुरेश जानकर व कुस्ती पटू राकेश मेट्रे यांनी संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी सर्व व्यायामपटू साधक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक वस्ताद वसंत कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन जयंत मोरे यांनी केले.
0 Comments