Hot Posts

6/recent/ticker-posts

रंगभरण स्पर्धेचे बक्षिस वितरण साने गुरुजी पतसंस्थेचा उपक्रम

 रंगभरण स्पर्धेचे  बक्षिस वितरण

साने गुरुजी पतसंस्थेचा उपक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार असल्याची माहीती पतसंस्थेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी दिली.

  साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या रौप्यमहौत्सवी वर्षाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पंधरा हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.एकुण तीन गटात ही स्पर्धा पार पडली.प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,गुलाबपुष्प व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.या कार्यक्रमास दिलीप पतंगे,शंकर चौगुले,माऊली झांबरे,राजेंद्र कुलकर्णी,आप्पासाहेब पाटील,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,अ.गफुर अरब व अनिल गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ६ वाजता स्नेहपुष्प लाॅन,अंत्रोळीकर नगर येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमास सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन भिमराया कापसे,सचिव आप्पाराव इटेकर,भाऊसाहेब मोरे,विरभद्र यादवाड,विनोद आगलावे,सुनिल चव्हाण,सचिन चौधरी,मुरलीधर कडलासकर,जयंत गायकवाड,धनाजी मोरे,उल्हास बिराजदार,शिवानंद हिरेमठ,महादेवी पाटील व फरजाना रचभरे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments