Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये 'पुस्तक अभिप्राय स्पर्धा' संपन्न व रक्तदान शिबिराचे आयोजन

 लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये 'पुस्तक अभिप्राय स्पर्धा' संपन्न व  रक्तदान शिबिराचे आयोजन 


टेंभूर्णी(कटूसत्य वृत्त):-श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी आयोजित संस्थेच्या सचिवा शिवमती सुरजाताई बोबडे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त "वाचाल तर वाचाल" या उपक्रमांतर्गत वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय देणे ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. 

 या स्पर्धेसाठी टेंभुर्णी व परिसरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये जनता विद्यालय, रयत शिक्षण संस्था, जिल्हा परिषद उजनी नगर केंद्र शाळा, सनराइज् इंग्लिश मीडियम गुरुकुल स्कूल टेंभुर्णी अशा अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी वाचन प्रिय व्हावा तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने व मोबाईल पासून दूर राहावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या सचिवा व टेंभुर्णीच्या विद्यमान सरपंच श्रीमती सुरजाताई बोबडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी वाचलेल्या कोणत्याही एका पुस्तकावर आपल्याला काय वाटतं? याविषयी आपला अभिप्राय नोंदवायचा होता. भाषाशैली, आत्मविश्वास, पुस्तक मांडणी, गुणदोष व पुस्तकाचा सार या सर्व मूल्यांकनांच्या बाबी लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ अशा पद्धतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचा बक्षीत वितरण समारंभ आणि भव्य रक्तदान शिबीर उद्या दि. ८ फेब्रुवारी रोजी संपन्न होईल . तरी संस्थेच्या वतीने परिसरातील सर्व रक्तदात्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा. 

 सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  प्राचार्य विकास करळे सर, संस्थेची संपर्क प्रमुख सागर खुळे सर, प्राध्यापक वजाळे सर, आडणे मॅडम रयतचे अर्जुन खटके सर, जनता विद्यालयाचे गणेश माडेकर सर आणि उजनी नगर केंद्र शाळेचे प्रदीप तांडले सर उपस्थित होते. प्रा. शक्ती सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. .या कार्यक्रमाची प्रास्ताविक इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सरडे हिने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी शिवानी गायकवाड तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी सुहाना शेख हिने केले.सदर कार्यक्रमा प्रसंगी संस्थेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एकूणच ही स्पर्धा आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली
Reactions

Post a Comment

0 Comments