मोहोळ येथे पत्रकार दिन साजरा
पोखरापूर- (कटुसत्य वृत्त):-
मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघ व तालुका दर्पण पत्रकार संघटनेच्यावतीने मोहोळ येथे बाळशास्त्री
जांभेकर यांना नूतन अध्यक्ष नसीर मोमिन व राजू साखरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांची शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित
करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीधर उन्हाळे हे होते. प्रारंभी मोहोळचे
पत्रकार चंद्रकांत बरकडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी दर्पण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू साखरे, ग्रामीण
पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष नशीर मोमिन, अरुण भोसले, रफीकभाई शेख, दिनेश सातपुते यांनी विचार
व्यक्त केले.
यावेळी पत्रकार संघाचे हणमंत पवार, विलास पवार, रजनीश कसबे, दादाराव पवार, अशोक कांबळे, भैय्या कांबळे, चेतन पाटील, नागेश पाटील, सचिन गवळी, नागेश देशपांडे उपस्थित होते. आभार दिनेश सातपुते यांनी मानले.
0 Comments