Hot Posts

6/recent/ticker-posts

रत्नाई कृषी कन्यांची सेंद्रिय शेतीला भेट

रत्नाई कृषी कन्यांची सेंद्रिय शेतीला भेट


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी माळीनगर येथील सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी व्ही. वाय .गवळी  व डी .ए. थोरवे यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली .त्यावेळी त्यांनी  शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष ,शेण ,गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली पाहिजे असे सांगितले.
      हरित क्रांती पूर्वी शेतामध्ये केवळ शेणखत वापरुन शेती केली जात होती. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत होती. हरित क्रांती नंतर रासायनिक खतांचा अवलंब देशात जास्त प्रमाणात  होऊ लागला. .सुरुवातीच्या काळात शेतमाल मोठ्या प्रमाणावर मिळू लागला. बहुतांश राज्य जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रसायनांचा अतिवापर करीत ,परिणामी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला . त्यामुळे आजच्या या आधुनिक युगात सेंद्रिय शेती तसेच त्याचे महत्त्व वाढत चालले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    या मध्ये कृषी कन्या प्रतीक्षा बनसोडे, जिजाऊ बरडे ,सोनाली गायकवाड, कोमल लाड ,इशा घोगरे, स्नेहल तांबोळकर ,प्राची जाधव, प्रणाली यादव , प्रतीक्षा हेगडे यांचा समावेश होता. प्राचार्य आर .जी. नलवडे, कार्यक्रम समन्वय प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा.एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.


Reactions

Post a Comment

0 Comments