जयहिंद विद्यालयातील पालके यांची राज्यस्तरासाठी निवड
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील पालके यांची राज्यस्तरीय निवड.कॅनवास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी, कळंब येथे 52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात जयहिंद विद्यालय,कसबे तडवळे येथील उपक्रमशील शिक्षक संदिप तुळशीदास पालके यांनी *बेस्ट फ्रॉम वेस्ट* हे शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य सादर केले होते. त्यांचा जिल्हातून प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक आला असून, त्यांची दुसऱ्यांदा *राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी* निवड झाली आहे. त्यांचा ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पालके एस. टी. यांनी विज्ञान प्रदर्शनातील यशाची परंपरा कायम राखत शाळेचे,गावाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल केले. यापूर्वीही त्यांचा व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला होता. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री. शि. शि. प्रसारक मंडळ,बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील,सर्व पदाधिकारी, शा.व्य.समितीचे अध्यक्ष टी. पी. शिनगारे,सर्व सदस्य,शिक्षण विस्ताराधिकारी किशोरी जोशी, केंदप्रमुख जगदीश जाकते, मुख्याध्यापक आर. डी. गाढवे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, ग्रामस्थ,यांनी कौतुक केले.
0 Comments