कोर्टी येथे नरेंद्र महाराज संस्थान च्या वतीने रक्तदान महायज्ञ संपन्न
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान यांच्यावतीने कोर्टी येथील कोयनाआई मंदिर येथे रक्तदान महायज्ञ संपन्न झाला या महायज्ञ रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परिक्षेत्राचे उपअधीक्षक संजय ताटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला
जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्तदान महायज्ञ आयोजन केले जाते या रक्तदान महायज्ञ कोर्टी येथे आयोजित करण्यात आला होता रक्तदान केल्याने ॲनिमिया हॅलो फेमिया ब्लड कॅन्सर किडनी कॅल्शियर अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत नियोजन केले जाते
रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळवून 24 तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते व रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच तीन ते चार महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब कर्करोग हृदयविकार होण्याची प्रमाण कमी होते म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे म्हटले जाते या रक्तदान शिबिरामध्ये कोर्टी येथील 59 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले
या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्था करणे साठी गावातील भक्त भारत शेळके दत्तात्रेय कोळेकर प्रतीक्षा गोसावी रत्नाकर शेळके मीना शेळके विजयमाला रोपळकर साक्षी सारणीकर संजय माने संदीप शेळके व कोर्टी येथील सर्व फक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते
0 Comments