नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
आपल्या पाल्यांकडे परिपूर्ण असे लक्ष दिले तर नक्कीच भारताची सेवा करण्यासाठी चांगल्या प्रकारचे अधिकारी निर्माण होतील.गोरगरीब मुलींना वाडी वस्तीवरून शाळेत येजा करण्यासाठी जी पायपीट करावी लागत होती त्यासाठी हिवरकर यांनी मुलींना मोफत सायकल वाटप केल्याने मुलींचा शाळेत ये - जा करण्याचा शैक्षणिक महामार्ग सुखकर केला असल्याचे मत सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांनी व्यक्त केले.
त्या श्री.श्री. ज्ञानमंदिर शिक्षण संस्था दहिगाव तालुका माळशिरस येथे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन,स्पर्धा प्रमाणपत्र व मुलींसाठी मोफत सायकल वाटप तसेच बचत गट यांना स्वस्त धान्य दुकान वाटप या कार्यक्रमाप्रसंगी त्याबोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुका शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील,
प्रमुख पाहुणे नातेपुते पोलीस ठाणेचे सपोनि महारुद्र परजणे, जि.प. सदस्या ऋतुजा मोरे तसेच रणजीत फुले, भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे, तसेच रियाज शेख, भीमराव फुले डॉ. रणजीत फुले मुख्याध्यापिका अनिता बनकर, सीमा एकतपुरे,
पोपटराव शिंदे,रणजीत जठार सनी बरडकर, सतीश बरडकर, सुनील बनकर, अभिजीत चांगण, निलेश ढोपे आदी. मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून संयुक्त जयंती निमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्र व मुलींसाठी मोफत सायकल वाटप तसेच बचत गट महिलांना रेशन दुकान व प्रमाणपत्र वाटप शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
यावेळी अध्यक्षस्थानी बोलत असताना माळशिरस तालुका शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की,शैक्षणिक सामाजिक, राजकीय, औद्योगिक अश्या अनेक क्षेत्रात देशांमध्ये महिलांची शंभर टक्के शक्ती वापरले जाते. शिवसेनेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील विविध गावातील बचत गटांना एकूण २७ रेशन दुकान दिली आहेत. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजकारणाचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेतील मुलींना सायकल वाटप केले. अनेक महिला व नागरिक शिवसेना भवन नातेपुते येथे समस्या घेऊन येतात त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही करत असल्याचे मत राजकुमारी हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी श्री श्री ज्ञानमंदिर येथील विद्यार्थी पालक शिक्षक तसेच शिवसेनेचे व भाजपचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments