Hot Posts

6/recent/ticker-posts

सिध्दोत्सव २०२५' मध्ये टेक्निकल व स्पोर्टस इव्हेंटमध्ये विविध स्पर्धा आयोजित

 सिध्दोत्सव २०२५' मध्ये टेक्निकल व स्पोर्टस इव्हेंटमध्ये विविध स्पर्धा आयोजित





सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये 'सिध्दोत्सव २०२५' चे उद्घाटन प्रमुख पाहण्या वैशाली अघोर व योगेश इंडी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले.तसेच वाचन संकल्प महाराष्ट्र ही संकल्पना १ ते १५ जानेवारीदरम्यान राबवण्यात येणार आहे. विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पूर्ण आठवडा सिध्दोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी आपल्या प्रेरणादायक भाषणात, अघोर म्हणाल्या,पुस्तक वाचन फक्त एक व्यक्तिगत आनंद किंवा छंद नसून त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या व व्यक्तिगत भल्यासाठी करणे अत्यंत आवश्यक आहे.प्राचार्य गजानन धरणे यांनी स्वागत करून सर्व विद्यार्थिनींना जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या युगात ज्ञान प्राप्ती केवळ व्यक्तिगत उद्देशांसाठी न करता, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
स्पोर्टस मैदान उद्घाटनप्रसंगी इंडी यांनी खेळाचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. 'सिध्दोत्सव २०२५' मध्ये टेक्निकल व स्पोर्टस इव्हेंटमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, असे सांस्कृतिक विभागप्रमुख सुचिता चौधरी यांनी प्रास्तविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती झंवर व भाग्यलक्ष्मी सुतार या विद्यार्थिनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. यावेळी डॉ. नीता आळंगे,डॉ. अविनाश पाटील, प्रमोद शिवगुंडे, नवनाथ माने, प्रतिभा पाटील, अतुल कंदले, श्रीशैल माळेवडी, कोमल चिट्टे, अमृता दौलताबाद व ग्रंथपाल रेणुका इरशेट्टी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments