राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांची भेट
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य पी. पी. वावा यांनी पंढरपूर नगर परिषदेला भेट दिली. सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि अडचणीवर चर्चा केली. पंढरपूर येथील विश्रामधाम येथे पंढरपूर नगरपरिषदमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींबाबत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,उपमुख्याधिकारी अॅड. सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नगर अभियंता नेताजी पवार यांच्यासमवेत पी. पी. वावा यांनी बैठक आयोजित केली होती.तसेच यावेळी १३ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने नियुक्तीचे आदेश देण्या आले.यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना
कायमस्वरूपी घरे बांधून देणे, लाड पागे शिफारशीनुसार नेमणुका करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचे बचत गट निर्माण करून त्यांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना
 शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार काम देणे, सफाई कर्मचारी आरोग्य शिबिर घेणे, सफाई कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम विमा उतरविणे,गुजराती कॉलनी येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरुस्ती करणे त्याठिकाणी लायब्ररी निर्माण करणे, ओपन जीम तयार करणे व इतर सेवा सुविधा कर्मचाऱ्यांना देणे, महिला  कर्मचाऱ्यांसाठी चेंजींग रूम तयार करणे यावर चर्चा करण्यात आली यावेळी गिरी नाथ, संदीप चरण, उपमुख्याधिकारी अॅड. सुनील
वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,
हाके, ऋषी अधटराव, चिदानंद सर्वगोड, चेतन चव्हाण, गुरू दोडिया, महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, धनाजी वाघमारे, संतोष सर्वगोड, दत्तात्रय चंदनशिवे, दिनेश साठे, जयंत पवार, अनिल गोयल, सतीश सोलंकी आदी उपस्थित होते.

 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments