सारोळे, खवणी,पोखरापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाला व पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २ ही योजना
कार्यान्वित करून सारोळे, खवणी,पोखरापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला व पिण्यासाठी उजनी धरणाच्या वितरिकेतून तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री डॉ.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकारी अभियंता खांडेकर यांना दिल्या दिल्या आहेत.उजव्या वितरिकेचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करुन पुढे पोखरापूर शिवेपर्यंतच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी पुन्हा नव्याने सर्व्हे करुन त्यास प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. सदर योजनेस तत्वत: मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे आश्वासनही शिष्टमंडळास दिले.यावेळी ना. विखे-पाटील यांच्यासमवेत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, विशेष कार्य अधिकारी किशोर मराठे, कै. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सुनील गावडे, जलसंपदा विभागाचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अभियंता खांडेकर इत्यादी मान्यवर यावेळी होते उपस्थित होते. ना. विखे-पाटील यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने सारोळे, खवणी, पोखरापूर परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments