एसव्हीसीएस कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील एस.व्ही.सी.एस. कनिष्ठ महाविद्यालय, भवानी
पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.प्रारंभी वीरतपस्वी चन्नवीर
शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे
पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ९५ एफएमच्या आरजे श्रध्दा पटेल उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींनी विविध गीतांवर नृत्य, भारुडे, सादर केली. तसेच काही विद्यार्थिनींनी संगीत वाद्य वाजवून आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्राचार्य ढाले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षक व पालकांनी प्रोत्साहन द्यावे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुणदेखील जोपासावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांचे ही मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, पालक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा रोडगीकर व रंजिता होळीकट्टी यांनी केले.शेवटी आभार प्रा. उस्तुरगे यांनी मानले.
0 Comments