Hot Posts

6/recent/ticker-posts

संघटनात्मक निवडणुकांसाठी जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक सक्षम करा

 संघटनात्मक निवडणुकांसाठी जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक सक्षम करा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-  तालुक्यात आगामी काळात देखील संघटनात्मक निवडणुकांसाठी सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक सक्षम करावी,असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना केले.भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानासंदर्भात येथे कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सध्या देशात सर्वत्र अत्यंत सक्रियतेने हे अभियान सुरू आहे. त्याच अनुषंगाने या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकत्यांनी सदस्यता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी बूथनिहाय नियोजन करावे, खास करून महिला कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांच्यासह माजी नगरसेवक

मीलन कल्याणशेट्टी, परमेश्वर यादवाड, प्रभाकर मजगे, यशवंत धोंगडे, फैज अहमद कोरबू,महेश हिंडोळे, विलास गव्हाणे,आनंद तानवडे, राजेंद्र बंदीछोडे,कय्युम पिरजादे, जयशेखर

पाटील, अरविंद ममनाबाद,अंकुश चौगुले, रामचंद्र अरवत,सुरेश गड्डी, केदार विभूते,

महादेव पाटील, सुनील कळके आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments