Hot Posts

6/recent/ticker-posts

गड्डा यात्रेत अल्पवयीन बालकांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या पालकांवर कारवाई

 गड्डा यात्रेत अल्पवयीन बालकांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या पालकांवर कारवाई



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
सिध्देश्वर गड्डा यात्रेच्या अनुषंगाने होममैदान याठिकाणी अल्पवयीन बालकांना नागरिकांकडून भीक मागण्यास भाग पाडल्याने त्यांच्या पालकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कारवाई करुन त्या बालकांची सुटका केली. या यात्रेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अंमलदार यांची एकूण ४ पथके तयार करून पेट्रोलिंग करत असताना १६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भीक मागणारी काही बालके आढळले.
मार्केट पोलीस चौकीकडून होम मैदानकडे जाण्यासाठी असलेले लोखंडी गेटजवळ तीन लहान बालके
स्वतःचे संपूर्ण अंग हे सिल्वर रंगाने रंगावून गड्डायात्रेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत होते. त्यांना ताब्यात घेवून बालकल्याण समिती समोर हजर केले असता त्यांना बालगृह येथे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रकरणी शामला पवार व सुमन पवार (रा. जुना एस. टी. स्टॅन्ड, धाराशिव) यांच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील महिला पोलीस उपनिरिक्षक अश्विनी काळे, अंमलदार हेमंत मंठाळकर, राजेंद्र बंडगर, महादेव बंडगर, सत्तार पटेल यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविली.
Reactions

Post a Comment

0 Comments