सोलापुरात पाच दिवस गावरान मेजवानी; असा असेल रुक्मिणी महोत्सव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 9, 2025

सोलापुरात पाच दिवस गावरान मेजवानी; असा असेल रुक्मिणी महोत्सव

 सोलापुरात पाच दिवस गावरान मेजवानी; असा असेल रुक्मिणी महोत्सव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री 16 ते 20 जानेवारी दरम्यान वोरो नाका प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
मिनी सरस व रूक्मिणी महोत्सव बाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्ह्यातून 65 व पुणे विभागातील इतर जिल्ह्यातून 10 स्टॉल असे एकूण 75 स्टॉल लावण्यात येणार आहेत.महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो.
या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इ.वस्तू यांचा समावेश आहे.या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात.शिवाय, घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील.हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages