श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात
"लेखिका व विद्यार्थी वाचक संवाद" हा उपक्रम
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय अक्कलकोट येथे संस्थेचे अध्यक्ष सौ शैलशिल्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. "लेखिका व विद्यार्थी वाचक संवाद" हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन केले आणि लेखिका सौ. आरती काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वाचनाचे महत्त्व सांगितले.
वाचनाने ज्ञानाची भूक भागते वाचन कसल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केले पाहिजे आणि नावाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाचे वाचन करून त्यावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ काळे यांनी वि स खांडेकर, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, भालचंद्र नेमाडे विं दा करंदीकर यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली. अक्कलकोट येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी कुंजविहारी यांच्या कवितेचा "मनी शोक करी धीर धरी शोक आवरी भेटेन नऊ महिन्यांनी" कवी कुंजविहारी यांच्या व कुसुमाग्रज यांच्या "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेविषयी सविस्तर माहिती सांगितली. कुसुमाग्रज हे आपल्या नावाने कविता लिहित व वि वा शिरवाडकर या नावाने गद्य लिखाण करीत होते असे यावेळी सांगितले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे राज्यामध्ये मराठी भाषा ही विकसित झाली पाहिजे यासाठी आपण वाचनालयाचा आधार घेणे गरजेचे आहे
श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात पन्नास हजार ग्रंथसंपदा असून प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनालयाचा सभासद होऊन पुस्तकाचे वाचन करावे म्हणजे बुद्धी प्रगल्भ होते आणि महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य योग्य आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री शहाजी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या संवादामध्ये सहभाग घेतला यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, माधव अहिरे, सहाय्यक ग्रंथपाल दिनकर शिंपी, सौ स्नेहा नरके, महादेव शिरसाटे आदी उपस्थित होते.
0 Comments