जीहे कटापूर योजनेचे पाणी माळशिरस तालुक्यातील गावांना देणार- मंत्री जयकुमार गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 2, 2025

जीहे कटापूर योजनेचे पाणी माळशिरस तालुक्यातील गावांना देणार- मंत्री जयकुमार गोरे

 जीहे कटापूर योजनेचे पाणी माळशिरस तालुक्यातील गावांना देणार- मंत्री जयकुमार गोरे




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- जीहे कटापूर योजनेचे पाणी पावसाळी हंगामात माळशिरस तालुक्यातील गावांना देणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी सांगितले. ना. गोरे यांच्या आंधळी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना माळशिरस भाजपाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
गत लोकसभा निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातील रेडे गावामध्ये जयकुमार गोरे यांनी जेहे कटापूर (ता. माण) योजनेतील पावसाळी हंगामामध्ये अतिरिक्त पाणी संभुखेड येथे सोडून ते पाणी रेडे येथील बंधारे व तलाव भरण्यासाठी देण्याचे आश्वासन पूर्ण केले. ते आमदार असताना हे आश्वासन पूर्ण केल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील जळभावी, माणकी, भांब, फडतरी या गावांना पाणी देण्यासाठी माण तालुक्यातील मोही, खुटबाव, इंजभाव, संभुखेड पर्यंती या गावांमधून पाणी सोडल्यास माळशिरस तालुक्यातील कन्हेर, लोणंद, इस्लामपूर गावांना याचा फायदा होईल. यावेळी सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, युवराज वाघमोडे, मिनीनाथ मगर, अॅड. गणेश सिद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages