Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोटहून निघाले, गाणगापूर येण्याआधी काळाने गाठले, भीषण अपघातात कुटुंब उद्ध्वस्त

 अक्कलकोटहून निघाले, गाणगापूर येण्याआधी काळाने गाठले, भीषण अपघातात कुटुंब उद्ध्वस्त




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. या भीषण अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अक्कलकोट ग्रामीण स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शानासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्वामी समर्थ दर्शनासाठी नांदेडहुन सोलापूरच्या अक्कलकोटला आले होते
अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गणगापूर येथील श्री दत्तच्या मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार ते नांदेडमधून सोलापूरला आले. त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारने गणगापूरच्या दिशेनं जात होते. वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांची आणि जखमीची नावे
अक्कलकोटहुन गाणगापूर येथे जाताना स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सागरबाई गंगाधर कर्णपल्ली(वय ४० वर्षे,रा केरूर,जि नांदेड), वैष्णवी हणमंत पाशावर (वय १४ वर्षे,रा केरूर जि नांदेड), गंगाधर कर्णपल्ली(वय ४५ रा,केरूर जि नांदेड),हणमंत गंगाराम पाशावर(३६ वर्षे,रा केरूर,नांदेड)अशी मृतांची नावे आहेत.

जखमींमध्ये नामदेव बालाजी वाडीकर(२९ वर्षे,रा नांदेड),ऋतुजा मोहन शीरलेवाड(वय ५ वर्षे,रा केरूर नांदेड),योगेश मोहन शीरलेवाड(वय ५ वर्षे,रा,केरूर जि नांदेड),तेजस गंगाधर मानवते(वय ३० वर्षे,आरोळ हिंगोली),कार्तिकी श्रेयस गुप्ता(वय २ वर्षे,राखेड पुणे),सविता हणमंत पाशावर(वय ४० वर्षे,कुंडलगी,नांदेड),पिंटू बाबूलाल गुप्ता(वय २८ वर्षे,रा चाकण पुणे),आकाश हणमंत पायावल(वय १० वर्षे,रा,कुंडलगी नांदेड),जयश्री गुप्ता(वय २५ वर्षे पुणे),छाया मोहन शीलेवाड(वय ३५ वर्षे,रा,नांदेड) अशी नावे आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments