टेंभुर्णीतील यशराज ऍग्रो इंडस्ट्रीज सन्मानीत
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- नुकतेच ग.दी माडगूळकर नाट्यग्रह,पुणे येथे यशराज ऍग्रो इंडस्ट्रीज टेंभुर्णी या आपल्या कंपनीने अल्पावधीमध्ये शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून दिलेल्या विहित मुदतीमध्ये कॅटल फीड प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या वतीने यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजला सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले.
यावेळी फिशरीज, ॲनिमल हसबंडरी अँड डेअरी केंद्रीय मंत्री राजीव राजनसिंग, केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बहेल, फिशरीज ॲनिमल हसबंडरी आणि डेअरी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, फिशरीज ॲनिमल हसबंडरी आणि डेअरी महाराष्ट्र मंत्री पंकजाताई मुंडे, प्रधान सचिव अलका उपाध्याय, डिपार्टमेंट ऑफ ऍनिमल हसबंडरी अँड डेरी भारत सरकार, गोसेवा आयोग मंडलचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, राज्यसभा सदस्य श्रीमती मेधाताई कुलकर्णी, विधान परिषद सदस्य श्रीमती उमाताई खापरे, विधान परिषद सदस्य अमित घोडके, प्रधान सचिव केंद्रीय पशुसंवर्धन विभाग श्रीमती वर्षा जोशी, अतिरिक्त सचिव केंद्र सरकार संजीवजी माथुर, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र सरकार सचिव डॉ. एन रामास्वामी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जी, आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन डॉ प्रवीण कुमार देवरे, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजींग डायरेक्टर व त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या सदर विभागातील संबंधित खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे देशातील व राज्यातील अनेक नामांकित कंपन्यांचे उद्योजक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग दि माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आजचा हा नयनरम्य सोहळा पार पडला.
0 Comments