सहकार महर्षी जयंतीनिमित्त नाॅलेजसिटी येथे रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2025

सहकार महर्षी जयंतीनिमित्त नाॅलेजसिटी येथे रक्तदान शिबिर संपन्न

 सहकार महर्षी जयंतीनिमित्त नाॅलेजसिटी येथे रक्तदान शिबिर संपन्न




"खा.धैर्यशील मोहिते-पाटील व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी केले रक्तदान"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नॉलेज सिटी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत १०० हून अधिक जणांनी रक्तदान केले.

विशेष म्हणजे, या शिबिरात खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी स्वत: रक्तदान करून आदर्श घालून दिला. त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, "रक्तदान ही सर्वात मोठी सेवा असून, या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते. युवकांनी अशा उपक्रमांत उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे."

कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील, सचिव धर्मराज दगडे, अश्रफ शेख,प्रा.सुभाष शिंदे, प्रा.भारत साठे, NSS समन्वयक अनिल लोंढे सर, तानाजी मदने व इतर मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही संस्थेने विशेष मेहनत घेतली. या उपक्रमातून तरुण पिढीला सामाजिक कार्याबाबत प्रेरणा मिळाली असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages