Hot Posts

6/recent/ticker-posts

कुरनूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडणार

 कुरनूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडणार



हंजगी (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणातून येत्या २६ किंवा २७ तारखेला पाणी सोडण्याचा निर्णय आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.वर्षभर पाणी पुरेल या हेतूने पाण्याचा वापर करावा. एप्रिलमध्येही काही प्रमाणात पाणी खाली सोडण्यात येणार आहे.वरील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. दरवर्षी कुरनूर धरणातून दोन वेळेस पाणी सोडले जाते. यावेळेस जानेवारीच्या अखेरीस हे पाणी सोडण्यात येणार असून कोल्हापूर पध्दतीचे
बोरी (कुरनूर) मध्यम प्रकल ता.अक्कलकोट. कालवा सल्लागार समिती सन २०२ २५ आठ बंधारे भरून घेतले जाणार आहेत. बंधाऱ्यामध्ये काही प्रमाणात गाळ आहे तो काढून घ्यावा, तसेच काही बंधाऱ्यांची दुरुस्ती येत्या दोन-तीन दिवसांत करून घ्यावी, अशा सूचनाही आमदार कल्याणशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. धरणात सध्या ८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याअनुषंगाने
एप्रिलमध्येही पाणी सोडण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कार्यकारी तीन नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न अवलंबून कुरनूर धरणावर अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी या तीन नगरपालिकेसह ५१ गावांचा पाणी प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करा, अशा सूचना यावेळी आ. कल्याणशेट्टी यांनी
दिल्या आहेत. वर्षभर पाणी पुरेल या हेतूने पाण्याचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले आहे.अभियंता मोहन जाधवर, उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, बोरी पाटबंधारे शाखेचे अभियंता पृथ्वीराज शेवाळे तसेच अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, सुनील बंडगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments