महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तोकडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 20, 2025

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तोकडी

 महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तोकडी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराचा विस्तार वाढत आहे. आग लागल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घेतली जाते. आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावत येऊन काम करतात.

मात्र शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी आहे. सध्या अग्निशमन दलाचा डोलारा केवळ पाच केंद्रांवर चालत आहे. खरेतर एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी 10 अग्निशमन केंद्रांची गरज आहे.

मालमत्तेला लागलेली आग यापासून लोक, प्राणी, साहित्य वाचवण्यासाठी अग्निशमन दल काम करते. अग्निशमन दलाच्या आजूबाजूच्या भागात आग लागल्यास विझविण्यासाठी अथवा एखाद्या कंपनीमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, नैसर्गिक आणीबाणी निर्माण झाल्यास सार्वजिनक ठिकाणी धोका निर्माण झाल्यास अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. शहराचा विचार केला असता महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तोकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. शहराची लोकसंख्या 12 लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात विविध भागात 10 फायर स्टेशनची गरज आहे. मात्र पाच केंद्रांवर अग्निशमन दलाचा डोलारा चालत आहे.

याठिकाणी आहेत फायर स्टेशन

नियमानुसार तीन लाख लोकसंख्येपर्यंत प्रत्येक 50 हजार लोकांमागे एक आणि तीन लाखांच्या पुढे एक लाख लोकांमागे एक फायर स्टेशन असले पाहिजे. त्यानुसार शहरात 10 फायर स्टेशनची गरज आहे. शहरात रविवार पेठ, सावरकर मैदान, होटगी रोड, भवानी पेठ, अक्कलकोट नाका, एमआयडीसी असे फक्त पाच ठिकाणी फायर स्टेशन आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages