वैराग (कटूसत्य वृत्त):- वैराग भागातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीतून सावरत असतानाच दुसरीकडे बिबट्याने वैराग शिवारात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास रेडकाची शिकार करून त्यांना ठार केले.
वनपाल एस. एस. पुरी यांनीही या भागात आढळलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैराग जवळील पिंपरी रोडवरील अमोल भोसले या शेतकऱ्याच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.
ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पानगाव फॉरेस्ट परिसरात नऊ जानेवारीला नागरिकांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्याच्या हल्ल्याविषयी पुढे फारसे काही आढळून आले नाही. मात्र पुन्हा एकदा आठ दिवसांनी वैराग येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी भालगाव येथे तरस या वन्य प्राण्याने रेडकावर हल्ला करून त्याला ठार केले होते. या आधीपासूनच या भागात वाघामुळे दहशत असताना, आता तरस व बिबट्या यांच्या हल्ल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- अमोल भोसले, शेतकरी, वैरागमी सकाळी सात वाजता शेतात धार काढण्यासाठी आलो होतो, धार काढून पुन्हा गुरे गोठ्याबाहेर बांधली. पुन्हा घरी येऊन नऊ वाजता शेतात गेलो असता, म्हशीच्या रेडकावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाल्याचे दिसून आले.
0 Comments