वाल्मिकची 'अण्णा'गिरी भोवली? धनंजय मुंडेना बाहेरचा रस्ता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 20, 2025

वाल्मिकची 'अण्णा'गिरी भोवली? धनंजय मुंडेना बाहेरचा रस्ता

 वाल्मिकची 'अण्णा'गिरी भोवली? धनंजय मुंडेना बाहेरचा रस्ता



बीड (कटूसत्य वृत्त):- सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री करू नका, अशी मागणी झाली.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उघडपणे यासाठी विरोध केला होता. तर विरोधकांनीही मुद्दा लावून धरला होता. अखेरीस धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदावरून पाणी फेरावं लागलं आहे. तर पंकजा मुंडे यांना मात्र जालना जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच मुंडे घराण्यातील व्यक्तीला बीडच्या बाहेर पालकमंत्रिपद मिळालं आहे.

राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्या उशिराने झाला. त्यानंतर पालकमंत्री कोण होणार, यासाठीही उशीर झाला. त्यातच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे बीडच्या पालकमंत्रिपदामुळे यादी पुन्हा रखडली, असल्याची चर्चा रंगली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडचे पालकमंत्रिपद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. अजित दादांकडे बीडसह पुण्याचंही पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.

विशेष म्हणजे, बीडमधील मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणात अवदा कंपनीला २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडसह तीन जण अटकेत आहे. पण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली. एवढंच नाहीतर मस्साजोगाच्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद न देण्याची मागणी केली. लोकांचा रोष पाहता महायुती सरकारने बीडचं पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडेंना न देण्याचा निर्णय घेतला, हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेरीस बीडला पहिल्यांदाच मुंडे घराण्यातील व्यक्तीकडे पालकमंत्रिपद नाहीये. बीडचे पालकमंत्रिपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages