महा किड्स स्कूल मध्ये महापुरुषांच्या जयंती व पत्रकरांचा सन्मान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
महा किड्स सीबीएससी स्कूलमध्ये महापुरुषांच्या
जयंती साजरी करत स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवशंकर पांढरे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन उपस्थित पत्रकरांचा सन्मान केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू आठवले,श्रीकांत बाविस्कर, मनोज राऊत तसेच स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवशंकर पांढरे चेअरमन तेजस्विनी पांढरे, सदस्य सुजाता मुंजी, स्कूलचे प्रभारी अधिकारी प्रीती हिंगणे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवांची एकत्रित जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुलांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करुण स्कूलमध्ये आनोखे फॅशनशोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजसुधारक, पत्रकार, राजकारणी,देशभक्त शेतकरी,वकील, वासुदेव तिरुपती बालाजी, छत्रपती शिवाजी महाराज तसेच पारंपारिक आणि वेस्टर्न पोशाख विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परिधान केले होते. विद्यार्थ्यांनी भाषण कौशल्यातून महापुरुषांच्या स्मृतीस अभिवादन केले. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवशंकर पांढरे बोलत असताना म्हणाले की, महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पालकांनी विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच संस्कार दिले पाहिजेत. पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे असल्याचे मत पांढरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ढोपे आणि वैशाली पालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योती बंडगर, रागिनी जाधव,कोमल रणदिवे, शैला ठोंबरे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments