Hot Posts

6/recent/ticker-posts

कारंजा रम येथील शाळेचा कोसळला स्लॅप, जिल्हा प्रशासन खेळत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.....!

कारंजा  रम येथील शाळेचा कोसळला  स्लॅप, 

जिल्हा प्रशासन खेळत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.....! 


अकोला (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील बाळापुर तालुक्या अंतर्गत ग्राम कारंजा रम येथील जिल्हा परिषद  शाळेचे वर्गखुल्याचे नवीन बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सेंट्रींग काढत असताना संपूर्ण स्लॅब कोसळला . या वर्ग खोलीचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे येथील ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य व मुख्याध्यापक पालक वर्ग यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष ,शिक्षण सभापती मायावती संजय नाईक ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी बी वैष्णवी यांच्याकडे लेखी तक्रार करून संपूर्ण बांधकाम झालेले बांधकाम पाडून नवीन बांधकाम बांधण्यात यावे अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. हा स्लॅप जर शाळा सुरू असताना पडला असता तर मोठा अनर्थ झाला असता . होणाऱ्या दुर्घटनेला कोण जबाबदार  ? प्रशासन, शाळेचे मुख्याध्यापक,का ठेकेदार,असा आरोप पालकांनी केला आहे. त्यातील गुण नियंत्रण विभागाचे कार्य हे कागदावरच आहेत का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जिल्हा प्रशासन आमच्या मुलांच्या जीवाशी खेळत आहे असा आरोप जनसामान्य  नागरिकांनी केला  आहे. या भ्रष्ट ठेकेदारावर, संबंधित बांधकाम इंजिनियर वर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे जनसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शासन शिक्षण क्षेत्राकडे करोडो रुपये खर्च करत असताना विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण ,आरोग्य, शाळेत बसण्याकरता चांगले बेंच   इमारती कामासाठी करोड रुपये निधी दिला जातो भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या  वृत्तीमुळे  शासनाच्या आदेशाला  तीरांजली  दिल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे. जो कोणी बांधकाम ठेकेदार असेल त्याची  चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राज्याचे  शिक्षण मंत्री दादा भुसे  काय कारवाई करतात. या कडे जनसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments