प्रचंड साधना आणि आत्मविश्वासाने सी. ए. परीक्षेत
उत्तीर्ण झाले. - प्रा.तानाजी माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरातील मुल शिकण्यासाठी त्यांना सोयी सवलती दिल्या पाहिजेत. सुंदर रचना आणि मांडणी करुन सर्व सोयीनेयुक्त “यशदा अभ्यासिका” सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यानी उमानगरी, जुना पुणा नाका, सोलापूर येथे अभ्यासिकेची व्यवस्था केल्याने अंकिता मुरक्या, वैभव करवा, सुमीत अभत्तनी या तीन विद्यार्थ्यांनी सी.ए. परीक्षेत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी महाराष्ट्र्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तानाजी माने यांनी असे उद्गार काढले. फुले दांपत्यांनी शिक्षणाची सोय केल्यामुळे स्त्रियांची प्रगती झाली, भविष्यात अशीही वेळ येईल की स्त्रियांची बरोबरी पुरुष करतील असे म्हणावे लागेल, असेही वक्तव्य त्यांनी केले.
शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विद्यानंद स्वामी सर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरीक्षक मा. संजय ढेरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करुन यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षभरात “यशदा अभ्यासिकेतून” दहा-बारा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांनी केले. आभार ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे यांनी मानले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, लिपीक सौ. दिपाली नरखेडकर, सौ. सारीका माडीकर, गीतांजली गंभिरे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments