शेतकर्यांमधून ऊस दराबाबत यंदा उठाव नाहीच
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. ऊस गाळप सुरू होण्यापूर्वीच अनेक संघटना ऊसदरावरून आक्रमक होऊन लढा देतात. मात्र यंदा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला, अद्याप एकही संघटना दराबाबत आवाज उठवताना दिसत नाही, सर्व शेतकरी संघटना शांत बसल्याचे दिसत आहे.राज्यात सोलापूरला साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बॉयलर अग्निप्रदीपनची तयारी कारखान्याकडून सुरू होताच दरवर्षी ऊस दराचा विषय सुरू व्हायचा. स्वाभिमानी, बळीराजा, जनहित, शरद जोशी प्रणीत संघटनांसह अन्य संघटनेकडून ऊसाच्या दरासह इतर मागण्यांसाठी कारखान्यासह जिल्हाधिकारी आणि साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला जात होता. यंदा मात्र सर्वत्र संघटना शांत असल्याचे दिसत आहे. सर्वच कारखान्याकडून 2700 ते 2750 या दरम्यानचा दर जाहीर करण्यात आला आहे. कारखाने एक महिना उशिराने सुरू झाले आहेत. यामुळे शेतकरी घाई करत ऊस कारखान्याला पाठवत आहेत. एखाद्या संघटनेकडून दराबाबत सहसंचालक साखर यांना निवेदन दिले. त्यानंतर मात्र संघटना आणि शेतकरी सगळेच शांत झालेले आहेत.
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनायंदा शेतकर्यांमधून उठाव झाला नाही. संघटनेकडून उसाला एफआरपी देण्याची मागणी करत निवेदन दिले. आता दर जाहीर करण्यात आलेल्या उसाचे पैसे शेतकर्यांना दिले जात आहेत. मात्र शेतकर्यांनी ज्या कारखान्यावर विश्वास असेल अशाच कारखान्याला ऊस द्यावा. उशिराने जाणार्या उसाचे पैसे कारखानदाराकडून उशीर देण्याची शक्यता आहे.

0 Comments