Hot Posts

6/recent/ticker-posts

सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त वैद्य, नल्लामंदू , मठपती यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे " आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ "

 सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त वैद्य, नल्लामंदू , मठपती यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे " आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ "




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-हीरक महोत्सव साजरा  करणाऱ्या सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वातीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनानिमित्त संचारकार स्व रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दै दिव्य मराठी चे वरिष्ठ वार्ताहर विनोद कामतकर यांना तर . 'कासिदकार ' स्व . अ. लतीफ नल्लामंदू  यांचे नावे असलेला पुरस्कार एबीपी माझाच्या जिल्हा प्रतिनिधी आफताब अन्वर शेख यांना आणि , बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्व बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ  दै तरुण भारतचे संपादक . प्रशांत माने यांना जाहिर करण्यात आले  अशी माहिती पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अय्यूब  नल्लामंदू यांनी दिली आहे.माने , कामतकर ,शेख  यांना जाहिर.गौरव पत्र , पांच हजार रुपये रोख , शाल श्री फळ , पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे .
"आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ " चे वितरण  विजापूर रोड सोलापूर येथील "पत्रकार भवन " च्या कै रंग्गा अण्णा  वैद्य सभागृह मध्ये ६ जानेवारी २०२५ दुपारी  १२ = ३०  वाजता हा कार्यक्रम संघाचे अध्यक्ष अशोक मठपती  यांच्या अध्यक्षतेखाली व शहर मध्य चे आमदार मा देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल या वेळी सोलापूरच्या पोलीस आयुक्त मा . एम . राजकुमारजी , जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील .


पुरस्कार प्राप्त आपल्या पत्रकार बंधुंचे कौतुक करण्यासाठी आपण या कार्यक्रमास सर्वानी वेळेवर उपस्थि रहावे ,   असे आवाहन निवड समितीचे अय्युब नल्लामंदू व सचिव प्रा पी पी कुलकर्णी यांनी केले आहे .

Reactions

Post a Comment

0 Comments